LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू

चिक्कोडी : विजेचा धक्का लागून 28 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील जोडकुर्ली गावात ही घटना घडली आहे.

पवन माने  असे वीज धक्क्याने मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पवन माने हे जोडकुर्ली गावात टायरचे दुकान चालवत होते. नेहमीप्रमाणे रात्रीचे काम आटोपून ते दुकान बंद करत असताना विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाला. 
दुकानातील शॉर्ट सर्किट किंवा जुन्या वायरिंगमुळे वीज प्रवाहित झाल्याने ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि हेस्कॉमचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून घटनेची पाहणी केली असून, मृत्यूचे नेमके कारण निश्चित करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रममतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकनाबाबत जनजागृती रॅलीविद्याभारती जिल्हास्तरीय कबड्डी, बुद्धिबळ, कराटे स्पर्धा उद्यापासूनशालेय स्तरावर स्पर्धा परीक्षाना अधिक महत्व द्यावे :सबलेफ्टनंट सुयश नुल्ले यांनी व्यक्त केले मतवृक्षारोपणातून दिला सामाजिक सलोख्यासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश : मोहरम, शाहू जयंतीनिमित्त 'भूमी वात्सल्य फाउंडेशन' कडून उपक्रमाचे आयोजन