LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

निपाणीत 7 लाखांच्या ऐवजावर चोरट्याचा डल्ला

निपाणी : शहरातील पंत मंदिराजवळ असलेल्या पूजा इलेक्ट्रिकल मोटर सेल्स अँड सर्व्हिस या दुकानात अज्ञात चोरट्याने चोरी करत सुमारे 7 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
यर्नाळा गावचे रहिवासी महावीर पत्रावळे यांचे पंत मंदिर परिसरात दुकान असून ते जनरेटर दुरुस्ती, वायरिंग, मोटार व पंप दुरुस्ती तसेच विक्रीचा व्यवसाय करतात. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाच्या मागील बाजूची काच फोडून लोखंडी गज वाकवले आणि आत प्रवेश केला.
दुकानातील नवीन व जुने तांब्याचे वायर, दुरुस्तीसाठी ठेवलेल्या मोटारी, नवीन मोटारी तसेच इतर साहित्य असा एकूण सुमारे 7 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांने चोरून नेला. सकाळी महावीर पत्रावळे दुकान उघडण्यासाठी आल्यावर चोरीचा प्रकार निदर्शनास आला.
 या प्रकरणी महावीर पत्रावळे यांनी निपाणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरात पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
निपाणीत 7 लाखांच्या ऐवजावर चोरट्याचा डल्लादुचाकींची अमोरासमोरून धडक : तरुणाचा जागीच मृत्यू , दुसरा गंभीर जखमीखानापूरात अंमली पदार्थविरोधी जनजागृती अभियानखानापूरात अंमली पदार्थविरोधी जनजागृती अभियानत्रिकुटाला अटक हिण्डाल्को कारखान्यात स्थानिक युवकांना रोजगार द्यावा :  ग्रामस्थांची मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे मागणीउभ्या टिप्परला कँटरची धडक :  दोघांचा जागीच मृत्यूबेळगाव महापालिकेत कर्नाटक समर्थनार्थ ठराव मंजूर करण्याची मागणी : 100 व्या दिवशीही आंदोलन सुरूचबेळगावात ‘जिन दीविगे’ आणि ‘मराठीतील एक कन्नड गतवैभव’ पुस्तकांचा  प्रकाशन सोहळाआमदार आसिफ सेठ यांनी दिली उज्ज्वल नगरला भेट : साधला स्थानिकांशी संवाद : केला विकासकामांचा शुभारंभ