LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपद

बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे, श्री भगवान महावीर शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या 17 वर्षाखालील शालेय मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत बेळगाव शहर संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सेंट मेरी स्कूल संघाने विजेतेपद पटकाविले तर बेळगाव पब्लिक स्कूल शिंदोळी संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.


अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बेळगाव पब्लिक स्कूल संघाने आठ षटकात सात गडी गमावून 45 धावा जमविल्या. कर्णधार समर्थ कुडचीकरणे सर्वाधिक 16 धावा काढल्या. सेंट मेरीज तर्फे स्वराज जुवेकर तीन तर अनिश तेंडुलकरने दोन गडी बाद केले.
प्रत्युत्तरदाखल सेंट मेरीज संघाने सहा षटका त दोन गडी गमावून 46 धावा काढून सामना आठ गडी राखून जिंकला. डावखुऱ्या अर्जुन येळुळरकरणे 20 व अमोघने 18 धावा काढल्या. सामन्यानंतर डी डी पी ओ जुनेद पटेल यांच्याहस्ते विजेत्या व उपविजेत्या संघातील खेळाडूंना चषक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी क्रीडा शिक्षक रमेश शिंगद, चंद्रशेखर तोगरी, महेश अक्की, अरवली, दोडमणी, नागराज भगवंतनावर, सिद्धेश ठाकूर, प्रकाश पुजेर, विनोद मोरारी सुनील देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.

विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी सेंट मेरी स्कूल संघात स्वराज जुवेकर, अतिश आदिलमठ, अर्जुन ए, अनिश तेंडुलकर, प्रज्योत वीरगौडर, पृथ्वी नाईक, समर्थ नावगेकर, अतुल पाटील व ऋषभ नाईक या  खेळाडूंची निवड झाली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती