LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

धावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!

बेळगाव: बेळगाव जिल्ह्यातील सावदत्ती तालुक्यातील जक्काबळ गावाजवळ दोन गावांतील विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. बसमधील विद्यार्थ्याला त्रास दिल्याच्या आरोपातून हा वाद उफाळल्याची माहिती समोर आली आहे.
जक्काबळ आणि बसरगी गावांतील विद्यार्थी एकाच बसने प्रवास करत असताना त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. बसमधून उतरल्यावर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी एकमेकांवर बेल्ट, दगड आणि काठ्यांनी हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली.
बसमधील विद्यार्थ्याच्या छळाच्या आरोपामुळे हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिक आणि ग्रामस्थांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांना कळविले. मात्र, पोलिस घटनास्थळी वेळेत पोहोचले नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच, उत्तर-पश्चिम कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (NWKRTC) अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट न दिल्याबद्दल स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली.
ही घटना सावदत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, ' नवरात्रोत्सव आणि दसरा हा समाजात एकता, परस्पर प्रेम, बंधुत्व आणि सलोखा वाढवणारा सण '' गुरुः साक्षात् परब्रह्म ' या आध्यात्मिक सोहळ्याचे आज बेळगावात आयोजनबेळगाव उत्तरच्या आमदारांचा जनता दरबार : नागरी समस्यांचे निवारण करण्याची दिली ग्वाही कुमारस्वामी म्हणताहेत, ' 2028 ला राज्यात आघाडीचे सरकार 'लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी घेतले तरुणाला ताब्यात ..!श्री रेणुकादेवी महिला मंडळा 'कडून ' एसटीएम ' च्या आई भवानी देवीला ' अर्पण करण्यात आली मानाची साडी-चोळीजिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडती