LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

महिलेचा चाकूने भोसकून खून 

हुबळी : 27 वर्षीय महिलेचा चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. हुबळी शहरातील दिवटे लेन परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. त्या महिलेच्या मित्रानेच धारधार चाकूने भोसकून महिलेला संपविल्याचे बोलले जाते.
किरण हबीब असे त्या महिलेचे नाव असून, ती फोटो स्टुडिओ चालवित होती.

  किरण हबीब हिच्या फोटो स्टुडिओमध्ये नेकनगर येथे राहणारा वेंकटेश नामक व्यक्ती कामाला होता. किरण ही दुसऱ्या एका व्यक्तीशी बोलत असल्याचे त्याने पाहिले आणि त्याचा राग अनावर झाला. त्याने तिच्याशी वाद घालत शिवीगाळ केली आणि धारदार चाकूने तिला भोसकले. यामध्ये ती गंभीर जखमी झाली आणि काही वेळातच रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाला. 

 किरण आणि वेंकटेश यांच्यात चांगलीच मैत्री होती. ती दुसऱ्याशी जवळीक साधत असल्याच्या संशयाने वेंकटेशला असुरक्षितता वाटत होती. यातूनच तो आतून तापून होता. आणि त्याने हा खेळच संपविण्याचा निर्णय घेतला होता. तो त्या वेळेची वाट पहात होता आणि ती संधी किरणने त्याला दिली. किरणला दुसऱ्या इसमाशी बोलताना वेंकटेशने  पाहिले आणि संतापलेल्या वेंकटेशने तिचा खात्मा केला, अशी चर्चा परिसरात होत असल्याचे सांगण्यात आले असले तरी त्याने तिला का संपविले याचे नेमके कारण समजू शकलेले नाही.   
या प्रकरणी कामारीपेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास चालविला आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
' त्या '  बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह आढळला खानापूरच्या मलप्रभेत : आत्महत्या की घातपात ? : शवविच्छेदनानंतर होणार सत्य उघडघरकुल यादीसंदर्भात हरकती नोंदवण्याची अंतिम तारीख 12 जूननिपाणी तालुका छायाचित्रकार संघटना पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड : अध्यक्षपदी संजय सूर्यवंशी तर सचिवपदी  विनायक पाटील यांची निवड अनुदानित शाळा-महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित समस्या निकालात काढाव्यात : सतीश जारकीहोळी यांना निवेदनमहामार्गावरील ' त्या ' बोगद्याचे रुंदीकरण करण्याची मागणी : खासदार प्रियांका जारकीहोळी यांना दिले निवेदनबेळगाव महापालिकेविरुद्ध कारवाई करण्याची कन्नड कृती समितीची मागणी ...!बी. के. हरिप्रसाद यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करू : मंत्री सतीश जारकीहोळीबेळगावमध्ये  2 लाखांहून अधिक रोपांची लागवड....... तर पालकाला नाहीतर गाडी मालकाला 25 हजारांचा फटका बसलाच म्हणायचा ...!महिलेचा चाकूने भोसकून खून