LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

पोलिसांनी आवळल्या ' विश्वनाथ ' च्या मुसक्या

अवघ्या 15 दिवसांत लावला घरफोडीचा छडा : 13 लाखांचा मुद्देमाल केला जप्त

बेळगाव : बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या- चांदीचा ऐवज लांबविणाऱ्या घरफोड्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. घरफोडीनंतर अवघ्या 15 दिवसांत चोरट्याला मुद्देमालासह जेरबंद करणाऱ्या मारिहाळ पोलिसांचे कौतुक होत आहे. 


विश्वनाथ दुर्गप्पा मुत्तूर (वय 26, रा. बेविनमुट्टी, ता. जि. बागलकोट) असे चोरट्याने नाव असून त्याने 10 मे 2026 रोजी
मरिहाळ पोलीस ठाणे हद्दीतील शिंदोळी गावातील महालक्ष्मीपूरम नगर येथे बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत घरातील ट्रेझरीमध्ये ठेवलेला सोन्या- चांदीचा किमती ऐवज लांबविला होता. 
घरफोडीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष पथक स्थापन करून घरफोडयांचा तपास चालविला होता.  दरम्यान 25 मे रोजी शिंदोळी गावातील इंडालनगर परिसरात गस्त घालत असताना एक संशयित व्यक्ती पोलिसांच्या हाती लागली.  चौकशीवेळी त्याच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांना खाक्या दाखवावा लागला. यानंतर त्या संशयिताने आपले कारनामे उघड करताना शिंदोळी येथील घरफोडीचीही कबुली दिली.
आरोपीविरुद्ध यापूर्वीही मरिहाळ पोलीस ठाण्यातील तीन तसेच काकती पोलीस ठाण्यातील एका घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद असल्याचे तपासात उघड झाले आहे.
पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 134 ग्रॅम सोन्याचे दागिने, 510 ग्रॅम चांदीचे दागिने आणि अन्य मुद्देमालासह एकूण 23 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. 

#burglary 
#marihalpolice 
#crime
#burglararrest

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती