LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

आमिषाचा बळी : बँक खात्यातून उडविले 99 हजार रुपये ...!

' अवघ्या 800 रुपयांमध्ये प्रवास ' या मोबाईवरील जाहिरातीला बळी पडलेल्या एका व्यक्तीला 99 हजार रुपये गमवावे लागले आहेत. 
 ' कमी रकमेत प्रवास ' या जाहिरातीला भुलून ऑनलाईन कार भाड्याने बुक करताना या व्यक्तीची 99 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समजते.
संजिव मुत्तेप्पगोळ असे आर्थिक फटका बसलेल्या व्यक्तीचे नाव असून ते प्रादेशिक आयुक्त कार्यालयात कर्मचारी आहेत.

 संजिव मुत्तेप्पगोळ यांनी अवघ्या  800 रुपयांत प्रवासासाठी कार उपलब्ध असल्याच्या मोबाईलवरील जाहिरातीवर विश्वास ठेवून एका जाहिरातीतील मोबाईल क्रमांकाशी संपर्क साधला.
संपर्क साधल्यानंतर प्रवाशी कार पुरविण्याची जाहिरात दिलेल्या इसमाने संजीव यांना एक अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगितले आणि नंतर प्रक्रिया म्हणून गुगल मिट (Google Meet) द्वारे मोबाईल स्क्रीन शेअर करण्यास भाग पाडले. स्क्रीन शेअरिंगच्या माध्यमातून त्यांनी संजीव यांच्या मोबाईलमधील बँकिंग संबंधित माहिती मिळवली. यानंतर काही वेळातच  खात्यातून तब्बल 99 हजार रुपये काढल्याचा  मेसेज संजिव मुत्तेप्पगोळ यांना आला. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुत्तेप्पगोळ यांनी बेळगाव शहर CEN पोलीस ठाण्याशी संपर्क साधून याबद्दल तक्रार दाखल केली.
या प्रकरणी बेळगाव शहर CEN पोलीस तपास करीत आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कंटेनर आणि मालवाहू ट्रक यांच्यात जोरदार धडक :  चालकाचा पाय तुटून वाहनात अडकलापंधरा दिवसात घरकुल वाटप न केल्यास आंदोलन :  माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी दिलाय ईशाराअज्ञातांनी मुलाला दिलं गुंगीचं इंजेक्शन ..! पण .….रविवार पेठेत कृषी केंद्राला लागली आग : भीषण आगीत 50 लाखांचा ऐवज झाला जळून खाकआमिषाचा बळी : बँक खात्यातून उडविले 99 हजार रुपये ...!गुरु-शिष्यातील नात्याचा भावस्पर्शी सोहळा : 33 वर्षानंतर मिळाला स्मृतींना उजाळाआणि त्यांनी स्वतःवर झाडून घेतली गोळी ...!6.70 कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजनमहांतेश नगरमध्ये  मनपाकडून होतेय नव्या भाजी मार्केटची उभारणीरौडीशीटर विल्सन गार्डन नागा जामिनावर .!