LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

पाण्याच्या खड्ड्यात पडून दोन चिमुकल्यांचा गेला जीव

धारवाड : घर बांधकामासाठी खोदलेल्या पाण्याच्या खड्ड्यात पडून दोन मुलांचा जीव गेला.
धारवाड तालुक्यातील मन्सूर गावात बुधवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे.



कुमार निंगप्पा मुदकन्नावर (वय 7 ) आणि प्रथम उळळागड्डी (वय 7 ) अशी पाण्याच्या खड्ड्यात पडून मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत.


प्रथम हा धारवाडमधील सत्तूर येथील रहिवासी असून तो सुट्टीसाठी आपल्या आजोळी आला होता. बुधवारी संध्याकाळी प्रथम आणि कुमार खेळण्यासाठी बाहेर गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला.
दरम्यान, गावातील एका व्यक्तीने घर बांधण्यासाठी पाण्याचा खड्डा खोदला होता. त्या खड्ड्यात दोन्ही मुले पडलेली आढळून आली. पाण्यात बुडाल्याने दोघांचाही मृत्यू झाला होता.
धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, ' नवरात्रोत्सव आणि दसरा हा समाजात एकता, परस्पर प्रेम, बंधुत्व आणि सलोखा वाढवणारा सण '' गुरुः साक्षात् परब्रह्म ' या आध्यात्मिक सोहळ्याचे आज बेळगावात आयोजनबेळगाव उत्तरच्या आमदारांचा जनता दरबार : नागरी समस्यांचे निवारण करण्याची दिली ग्वाही कुमारस्वामी म्हणताहेत, ' 2028 ला राज्यात आघाडीचे सरकार 'लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी घेतले तरुणाला ताब्यात ..!श्री रेणुकादेवी महिला मंडळा 'कडून ' एसटीएम ' च्या आई भवानी देवीला ' अर्पण करण्यात आली मानाची साडी-चोळीजिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडती