LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

मारहाणीच्या आरोपातून तिघे निर्दोष ..!

बेळगाव ( bn7 news) : लाठी-काठी आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याच्या आरोपातून तिघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारातील विसंगतीचा फायदा घेत या आरोपातून तिघे निर्दोष सुटले.


मारुती पुंडलिक सुतार, (वय 36 वर्षे, पिरनवाडी, ता. जि. बेळगाव), आकाश परशुराम सुरतेकर ( वय 26 वर्षे, राहणार पिरनवाडी. ता. जि. बेळगांव) आणि प्रकाश परशुराम सुरतेकर ( वय 23 वर्षे, राहणार: पिरनवाडी. ता. जि. बेळगांव ) निर्दोष मुक्तता झालेल्या आरोपींची नावे आहेत.


सुरुतेकर हे आपल्या घरचे काही बांधकाम आणि दुरुस्तीचे काम करून घेत असताना चुकून घरासमोर राहणाऱ्या कृष्णा जयवंत गुरव यांच्या घराचा ड्रेनेज पाईप फुटला. यामुळे कृष्णा गुरव यांनी सुरुतेकर यांचे घर गाठून फोडलेला पाईप काढून त्या ठिकाणी नवीन ड्रेनेज पाईप घालून देण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या वादानंतर सुरुतेकर यांनी, तुला काय करायचे ते कर , आम्ही नवा पाईप देणार नाही ' , असे म्हटले. यामुळे वाद आणखीनच वाढला आणि यानंतर
मारुती पुंडलिक सुतार, आकाश परशुराम सुरतेकर आणि प्रकाश परशुराम सुरतेकर तिघांनी कृष्णा जयवंत गुरव यांना लाठी-काठी आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जबर जखमी केले. इतक्यावरच न थांबता त्या तिघांनी कृष्णा यांना जीवे मारण्याची धमकीही दिली. आसपासच्या लोकांनी धाव घेऊन भांडण मिटवले. मारहाणीत जखमी झालेल्या कृष्णा गुरव यांना उपचारासाठी बेळगाव जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले, अशी फिर्याद कृष्णा गुरव यांच्या पत्नी सुरेखा कृष्णा गुरव ( राहणार : सिध्देश्वर गल्ली, मारुती नगर, पिरनवाडी, बेळगांव) यांनी बेळगाव ग्रामीण पोलिसात दाखल केली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी पंचनामा करून तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता आणि आरोपींच्या विरुध्द न्यायालयात दोषारोप दाखल करण्यात आले होते.



याप्रकरणी सरकार तर्फे न्यायालयात साक्षीदार, मुद्देमाल व कागदोपत्री पुरावे तपासण्यात आले. पण प्रत्यक्षदर्शी साक्षीदारातील विसंगतीमुळे येथील दुसरे जे. एम. एफ. सी न्यायालयाचे नायाधीशानी तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
आरोपींच्यावतीने फौजदारी वकील मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहीले.


 

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, ' नवरात्रोत्सव आणि दसरा हा समाजात एकता, परस्पर प्रेम, बंधुत्व आणि सलोखा वाढवणारा सण '' गुरुः साक्षात् परब्रह्म ' या आध्यात्मिक सोहळ्याचे आज बेळगावात आयोजनबेळगाव उत्तरच्या आमदारांचा जनता दरबार : नागरी समस्यांचे निवारण करण्याची दिली ग्वाही कुमारस्वामी म्हणताहेत, ' 2028 ला राज्यात आघाडीचे सरकार 'लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी घेतले तरुणाला ताब्यात ..!श्री रेणुकादेवी महिला मंडळा 'कडून ' एसटीएम ' च्या आई भवानी देवीला ' अर्पण करण्यात आली मानाची साडी-चोळीजिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडती