LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

चोरट्यांचा मजेशीर प्रताप : विद्यापीठाची वायरिंगच नेली उखडून 

धारवाड : चोरटे काहीही चोरून नेऊ शकतात बरं का. कधी बंद घराचा कडी-कोयंडा उचकटून घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड, तर ग्रामीण भागात शेतीला आणि विहिरीला लावलेल्या विद्युत मोटारी. पण धारवाड मध्ये चोरट्यांनी चक्क विद्यापीठातील इमारतीच्या वीज पुरवठा करणाऱ्या वायरच उचकटून नेल्या. यामुळे विद्यापीठाच्या एका विभागाला अंधारात राहावं लागलं आहे.

धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठाच्या विस्तीर्ण कॅम्पसमध्ये वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत आहे. नुकत्याच घडलेल्या एका धक्कादायक घटनेत कन्नड अभ्यास विभागात चोरी होऊन संपूर्ण इमारत अंधारात बुडाली आहे.
आर. सी. हिरेमठ यांच्या कन्नड अध्ययन पीठाचे अलीकडेच लाखो रुपये खर्च करून डिजिटायझेशन करण्यात आले होते. अशा महत्त्वाच्या विभागात ही चोरी झाली. विभागातील साहित्य चोरीला गेले नसले तरी चोरट्यांनी संपूर्ण इमारतीतील वीजपुरवठ्याची वायरिंगच उचकटून नेली आहे.
चोरट्यांनी भूतळ (ग्राऊंड फ्लोर) तसेच वरच्या दोन मजल्यांवरील सर्व विद्युत वायर काढून नेल्याने संपूर्ण इमारतीचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी व कर्मचारी यांना अंधारातच काम करावे लागत आहे. याशिवाय विभागातील नळही चोरीला गेले आहेत.
या घटनेनंतरही विद्यापीठ प्रशासनाने अद्याप पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही, यामुळे विद्यार्थ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे. या चोरीमुळे कॅम्पसच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, इमारतीतील पुरुषांच्या स्वच्छतागृहाजवळील व्हेंटिलेटरला लावलेली जाळी पूर्वीच तोडण्यात आली होती. त्याच मार्गाने चोरट्यांनी प्रवेश केला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, विद्यापीठाच्या सुरक्षेसाठी खासगी सुरक्षा संस्थेला करार देण्यात आला असून, शंभराहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात आहेत. तरीही अशी चोरी होणे आणि त्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न होणे, यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या कर्नाटक विद्यापीठासाठी अशा घटना अधिकच डोकेदुखी ठरत आहेत. चोरीच्या प्रकरणाची तातडीने चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम