LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

तहसीलदार कार्यालयात युवकाची यथेच्छ धुलाई ..!

गदग : एका व्यक्तीची विचारणा करण्यासाठी कार्यालयात आलेल्या युवकाची तहसीलदार कार्यालयात अधिकाऱ्यांनी यथेच्छ धुलाई करीत लोकशाही नाही तर ठोकशाहीचे दर्शन घडविले.


गदग शहरातील तहसील कार्यालयात एका अधिकाऱ्याच्या दादागिरीचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून, उप तहसीलदार आणि त्यांच्या साथीदारांनी कार्यालयातच विचारणा करण्यासाठी आलेल्या युवकाला मारहाण केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद जनमानसात उमटत आहेत.


अक्षय बोलकोळ्ळी या युवकाच्या मित्राच्या दुचाकीला उप तहसीलदार एस. डी. वाल्मिकी यांच्याशी संबंधित व्यक्तीच्या कारने धडक दिल्याची घटना कार्यालयाजवळच घडली होती. या घटनेची चौकशी आणि जबाबदार व्यक्तीची माहिती घेण्यासाठी अक्षय तहसील कार्यालयात गेला होता. कार कोणाची आहे ? त्या कार चालकाचे नाव सांगा, असे विचारल्यावर उप तहसीलदार एस. डी. वाल्मिकी आणि त्यांच्या सहकऱ्यांनी, अक्षयला कार्यालयात बोलावून त्याला मारहाण केल्याचे सांगण्यात येते.


या प्रकरणात वाल्मिकी यांच्यासोबत काँग्रेस नेते विद्याधर दोड्डमनी आणि आणखी एक जण सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. तिघांनी मिळून अक्षयवर हल्ला केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर डोळेझाक करणाऱ्या पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या निष्क्रियतेवर लोकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. उप तहसीलदार व संबंधितांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.


या घटनेचे व्हिडिओ आणि पुरावे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून, प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. घटनेची माहिती मिळताच एका पोलिस अधिकाऱ्याने समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याची चर्चाही सुरू आहे.


तहसील कार्यालयातच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे हे वर्तन पाहता, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची घडी विस्कळीत झाल्याचे स्पष्ट होत आहे. या व्हिडिओमधून प्रशासनातील दडपशाहीचा चेहरा स्पष्ट होतो. जिल्हाधिकाऱ्यांनी दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी श्रीराम सेनेचे राज्य प्रमुख राजू खानप्पनवर यांनी केली आहे.


Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती