LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

खानापूर ( bn7 news) : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. खानापूर तालुक्यातील कोडचवाड गावानजीक असलेल्या देमीनकोप येथील तलावात आज रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे.
तरुण चलवादी असे तलावात बुडून मरण पावलेल्या युवकाचे नाव आहे.


तरुण हा हल्ल्याळ तालुक्यातील कंचनोळी गावचा रहिवासी. मावशीच्या गावी श्री कलमेश्वर देवाची यात्रा साजरी करण्यासाठी तो कोडचवाडला आला होता. मात्र, यात्रा साजरी करण्याआधीच नियतीने डाव साधला.

उद्या सोमवार 7 तारखेपासूनपासून कोडचवाड गावची श्री कलमेश्वर देवाची यात्रा होत आहे. बुधवार 8 तारखे पर्यंत यात्रा चालणार आहे. कोडचवाड हे तरुण चलवादी याच्या मावशीचे गाव. सदर यात्रा प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात भरवली जाते. ही यात्रा साजरी करण्यात तरुण मावशीकडे आला होता.
यात्रेनिमित्त आज घरातील स्वच्छता करून कपडे धुण्यासाठी तो व त्याच्या कुटुंबातील लोक देमीनकोप येथील तलावावर आले होते. यावेळी तलावात डुबकी मारण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. तो पाण्यात उतरला पण पाण्याचा अंदाज त्याला आला नाही. त्याला चांगले पोहता येत नव्हते. गटांगळ्या खात तो पाण्यात बुडाला. आपल्या डोळ्यासमोरच समोरच त्याला बुडताना पाहून कुटुंबियांनी आरडाओरड केली पण काहीच उपयोग झाला नाही. त्याचा बुडून मृत्यू झाला. कुटुंबातील लोकांनी एकच आक्रोश केला. घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली व त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो सापडला नाही. त्यामुळे अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह हाती लागला. सदर घटनेची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात झाली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम