LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

विष प्राशन केलेल्या ' त्या '  मुख्याध्यापकांचा मृत्यू ...!

दावणगेरे : दावणगेरे जिल्ह्यातील हरिहर तालुक्यातील कोक्कनूर येथील सरकारी वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेत सहशिक्षक आणि स्वयंपाक कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या वादातून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या ' त्या ' मुख्याध्यापकांचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला.

जयप्पा (वय 55) असे त्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.

मुख्याध्यापक जयप्पा यांचा शाळेतील सहशिक्षक आणि शाळेतील स्वयंपाक कर्मचाऱ्यांसोबत अंतर्गत वाद झाला आणि या वादातून त्यांनी मंगळवारी शाळेच्या स्वच्छतागृहात जाऊन विष प्राशन केले, असा आरोप आहे. 
अत्यवस्थ झालेल्या जयप्पांना स्थानिक नागरिक आणि शिक्षकांनी तातडीने दावणगेरे येथील चिगटेरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने बुधवारी त्यांचा मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून शाळेत अंतर्गत वाद सुरू होते. मंगळवारी एसडीएमसी सदस्य आणि गावातील ज्येष्ठांच्या उपस्थितीत सामोपचार बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीदरम्यान जयप्पा अचानक उठून स्वच्छतागृहात गेले आणि तेथे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला, अशी माहिती समोर आली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतता आणि सौहार्दाने मोहरम साजरा करण्यावर भरयुवकाच्या छातीत खुपसला होता चाकू : खूनप्रकरणी तरुणीला 7 वर्षांची कारावासाची शिक्षाइतरांच्या खासगी फोटो-व्हिडिओ शेअर केल्यास तो ठरणार गुन्हा :  डीजीपी डॉ. एम.ए. सलीम यांचे आदेशविष प्राशन केलेल्या ' त्या '  मुख्याध्यापकांचा मृत्यू ...!त्या  प्राध्यापकावर करण्यात आली निलंबनाची कारवाई .! शहर न सोडण्याचा देण्यात आलाय आदेश ..!!232 तहसीलदार ग्रेड-2 अधिकाऱ्यांना पदोन्नती : उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांची माहितीविधवेशी जुळले सुत : पतीने केला पत्नीचा खून पतीने चिरला पत्नीचा गळा : चारित्र्याच्या संशयातून पडला मुडदाहार्ट अटॅकने बॉडीबिल्डरचा मृत्यूगळफास घेऊन पीएसआयने केली आत्महत्या ..!