LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

सुनेचा खून करून केला अपघाताचा बनाव ...?

अथणी : सासू-सासऱ्याने सुनेचा खून करून अपघातात तिचा मृत्यू झाल्याचा बनाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


मुलं होत नसल्याच्या कारणावरून सासू-सासऱ्याने सुनेला ठार केल्यानंतर खून पचविण्यासाठी ती दुचाकीवरून पडून मरण पावल्याची कहाणी बनविण्यात आल्याची फिर्याद पोलिसात करण्यात आली आहे.


अथणी तालुक्यातील बळ्ळीगेरी – मलाबाद रस्त्यावर ही घटना घडली असून रेणुका संजय होनकांडे (वय 32) असे दुर्दैवी मयत महिलेचे नाव आहे.


मुलं होत नसल्याने रेणुका हिला सासरे कामण्णा होनकांडे आणि सासू जयश्री होनकांडे यांनी दुचाकीवरून एका निर्जनस्थळी नेले आणि तिथे दगडाने घाव घालून तिचा खून केला. यानंतर हा अपघात भासविण्यासाठी तिचामृतदेह दुचाकीच्या बाजूला ठेवून ती दुचाकीवरून पडून मेली असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मयत रेणुकेच्या माहेरच्यांनी केला आहे.
या प्रकरणी सासू-सासऱ्याविरुद्ध अथणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी चालविली आहे.


Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल