LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

गोकाकमध्ये एकाची आत्महत्या : आत्महत्येआधी लिहून ठेवलीय डेथनोट ..!

news_1780404758_0_501.webp

 

बेळगाव :  गोकाक तालुक्यातील बेंडिगेरी गावात एका व्यक्तीनेगळफास लावून आत्महत्या केली आहे.  त्याने आत्महत्या करण्याआधी एक डेथ नोट लिहून ठेवली असून त्यामध्ये त्याने आत्महत्येचे कारण आणि करणीभूतांची नावे नमूद केल्याचे समजते.

 रवींद्र दानव्वगोळ असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्यांने आपल्या जीवितास धोका असल्याने हा टोकाचा निर्णय घेत असल्याचे नमूद केल्याचे  बोलले जाते. 
त्याने दोघांकडून 8 लाख रुपये कर्ज घेतल्याचा आणि कर्जाची परतफेड करण्यासाठी त्याला वारंवार जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. याबाबत पोलिसांकडे तक्रार करूनही न्याय मिळाला नसल्याचे त्याने चिठ्ठीत लिहून ठेवल्याचे समजते.
 घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
घटनेची माहिती मिळताच मुडलगी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. मृताच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून मुडलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल