LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

गळफास घेऊन उपतहसीलदाराची आत्महत्या ..!

हासन : 52 वर्षीय उपतहसीलदाराने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चार पानांची सुसाईड नोट लिहून ठेवल्याचे कळते. या सुसाईड नोटमध्ये नेमका काय मजकूर आहे, त्यांनी स्वतःला का संपविले हे अद्याप समजू शकले नाही. मात्र,सुसाईड नोट ही कारणे लवकरच स्पष्ट करेल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

तिमय्या असे गळफास लावून घेऊन आत्महत्या केलेल्या उपतहसीलदाराने नाव असून हासन शहरातील बीएम रोडवरील एका खासगी लॉजमधील एका रूममध्ये त्यांनी  गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
तिम्मय्या हे म्हैसूर जिल्ह्यातील सालिग्राम येथे उपतहसीलदार म्हणून कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी तीन वर्षे हासन येथेही सेवा बजावली होती.
शनिवार (30 मे) रोजी त्यांनी लॉजमध्ये चार पानांची सुसाईड नोट लिहून ठेवत त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मूळचे कोडगू जिल्ह्यातील असलेले तिम्मय्या हे हासन शहरातील चन्नपट्टणा येथील द्यावम्मा लेआउटमध्ये कुटुंबासह राहत होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास बडावणे पोलीस करीत आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती