LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

सोलापूरच्या प्रसिद्ध न्यूरो सर्जनने केली आत्महत्या : झाडून घेतली डोक्यात गोळी : जगभ्रमनाचे स्वप्न राहिले अपुरेच ....!

सोलापूर : सोलापूरच्या एका प्रसिद्ध न्यूरो सर्जनने आत्महत्या केली आहे. रात्री 8.30 वाजता पिस्तुलाने डोक्यात गोळी झाडून घेऊन त्यांनी मृत्यूला कवटाळले.


शुक्रवारी रात्री सोलापूर शहरातील वैद्यकीय क्षेत्राला हादरवणारी ही घटना घडली. प्रख्यात न्यूरो सर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांनी स्वतःच्या सात रस्ता परिसरातील राहत्या घरी पिस्तुलाने डोक्यात गोळी झाडून घेतली. गंभीर जखमी झालेल्या  डॉ. शिरीष वळसंगकर यांना तात्काळ त्यांच्या स्वतःच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.


डॉ. शिरीष वळसंगकर यांचे सोलापुरात स्वतःचे हॉस्पिटल होते. येथे त्यांनी हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले होते.


डॉ. वळसंगकर यांना विमानाद्वारे जगभ्रमंती करण्याची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांनी विशेष ‘डबल इंजिन डायमंड’ हे खासगी विमानही खरेदी केले होते. जग फिरण्याची तयारीही सुरु झाली होती. मात्र त्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हे समजू शकले नाही.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम