LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

नरेगाची मजुरी लाटण्यासाठी चक्क पुरुषांनी नेसल्या साड्या

यादगीर : ' प्रेमासाठी वाट्टेल ते ' असं खूपदा ऐकलं असेल पण हल्ली ' पैशासाठी वाट्टेल ते ' असा प्रकार कोणत्या ना कोणत्या कारणाने पहावयास आणि ऐकावयास मिळतो आहे. असाच प्रकार यादगीर जिल्ह्यातील मल्दार गावात पहावयास मिळाला.


नरेगाची मजुरी लाटण्यासाठी पुरुषांना साडी नेसवून चक्क महिला बनविण्यात आले. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (नरेगा) अंतर्गत मजुरी रक्कम हडप करण्यासाठी पुरुषांना साडी नेसवून महिलांच्या नावावर काम दाखवण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनही चक्रावले आहे.


जिल्ह्यातील मल्दार गावात सण्णलिंगप्प यांच्या शेतात तीन लाख रुपयांच्या नाल्याच्या साफसफाईचे काम सुरू असून, त्यात मजुरी रक्कम हडप करण्यासाठी पुरुषांना साडी नेसवून महिलांच्या नावाने कामाची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने याची राज्यभर चर्चा आहे.

या वृत्ताला जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी लविश ओरडिया यांनी दुजोरा दिला असून ही घटना फेब्रुवारी महिन्यात घडली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मिळालेल्या तक्रारीनुसार कारवाई करण्यात आली असून ठेकेदाराला निलंबित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
नरेगा योजनेंतर्गत सदर कामासाठी अजून कोणतीही रक्कम वितरित करण्यात आलेली नाही, असेही जिल्हा पंचायत सीईओनी म्हटले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती