LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

रौडीशीटर विल्सन गार्डन नागा जामिनावर .!

जुलै 2024 पासून आहे हिंडलगा कारागृहात ..!

बेळगाव : रौडीशीटर विल्सन गार्डन नागा याला बेळगावच्या हिंडलगा कारागृहातून जामिनावर सोडण्यात आले आहे.

सिद्धापूर येथे महेश यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेला रौडीशीटर विल्सन गार्डन नागा हा हिंडलगा कारागृहात स्थानबद्धतेत होता. त्याची जामिनावर कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.

हिंडलगा कारागृहात ठेवण्याआधी तो बेंगळूर मधील परप्पन अग्रहार कारागृहात होता. मात्र, कारागृहात चहा पिताना आणि सिगारेट ओढतानाचा त्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याला तेथून  बेळगावच्या हिंडलगा कारागृहात हलविण्यात आले होते. जुलै 2024 पासून तो हिंडलगा कारागृहात होता.
त्याची  तब्बेत बिघडल्याने त्याला बेळगाव जिल्हा इस्पितळातील कैदी उपचार कोठडीत हलविण्यात आले होते. तिथे त्याच्यावर  गेल्या आठवडाभरापासून उपचार सुरू होते. उपचार पूर्ण झाल्यानंतर आज त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST