LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

गळफास घेऊन पीएसआयने केली आत्महत्या ..!

कलबुर्गी : कलबुर्गी येथे एका पोलीस उपनिरीक्षकाने (पीएसआय) घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

बसवराज असे आत्महत्या केलेल्या पीएसआयचे नाव असून ते डीसीआरबी विभागात कार्यरत होते. प्राथमिक माहितीनुसार, कामाच्या तणावामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  बसवराज यांनी शनिवारी सकाळी त्यांच्या खोलीचे दार बराच वेळ उघडले नाही. कुटुंबियांनी दरवाजा ठोठावूनही दरवाजा न उघडल्याने कुटुंबीयांना संशय आला. त्यांनी दार फोडून आत प्रवेश केला असता बसवराज यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले.
बसवराज यांनी आत्महत्या केलेल्या आदल्या रात्री, म्हणजेच शुक्रवारी रात्री आपल्या मित्रांना फोन करून आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते, असे सांगण्यात येते. 
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, ' नवरात्रोत्सव आणि दसरा हा समाजात एकता, परस्पर प्रेम, बंधुत्व आणि सलोखा वाढवणारा सण '' गुरुः साक्षात् परब्रह्म ' या आध्यात्मिक सोहळ्याचे आज बेळगावात आयोजनबेळगाव उत्तरच्या आमदारांचा जनता दरबार : नागरी समस्यांचे निवारण करण्याची दिली ग्वाही कुमारस्वामी म्हणताहेत, ' 2028 ला राज्यात आघाडीचे सरकार 'लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी घेतले तरुणाला ताब्यात ..!श्री रेणुकादेवी महिला मंडळा 'कडून ' एसटीएम ' च्या आई भवानी देवीला ' अर्पण करण्यात आली मानाची साडी-चोळीजिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडती