LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी एकाला अटक

बेळगाव : उद्यमबाग पोलिसांनी अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करत एका व्यक्तीला अटक केली आहे.

देवेंद्र नारायण नाईक (वय 41, राहणार : बालकूर, ता. होन्नावर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. देवेंद्र हा उद्यमबाग येथील अरुण फॅक्टरीजवळ सार्वजनिक ठिकाणी कोणतीही शासकीय परवानगी नसताना गोवा राज्यातील मद्याची अवैधरित्या विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार पीएसआय प्रविण बिरादार व त्यांच्या पथकाने छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मॅजिक मोमेंट्स व्होडका, रिझर्व्ह सेवन व्हिस्की, डीएसपी ब्लॅक आदी विविध ब्रँडच्या एकूण 11.5 लिटर मद्याचा साठा जप्त करण्यात आला. 
जप्त करण्यात आलेल्या मद्याची एकूण किंमत 4520 रुपये आहे.
याप्रकरणी उद्यमबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल