LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या 

निपाणी : 
नवविवाहितेने लग्न झालेल्या अवघ्या 39 व्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना निपाणी येथे उघडकीस आली आहे. गुरुसिद्धवा प्रशांत हागरगी (वय 36 रा. हरीनगर पहीली गल्ली, निपाणी) असे तिचे नाव आहे. घटनेची नोंद शहर पोलिसांत झाली असून सासरकडून होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून गुरुसिद्धवा हिने  आत्महत्या केल्याची तक्रार आहे गुरुसिद्धवा यांच्या बहिणीने केली आहे.
गुरुसिद्धवा हिचा विवाह प्रशांत हागरगी याच्याशी 21 एप्रिल रोजी निपाणीत झाला होता. विवाहानंतर 15 दिवसांनी सासू महानंदा अशोक हागरगी यांनी तिचा मानसिक छळ सुरू केला सुरू केला. गुरुसिद्धवा हगरगी या नवविवाहितेने याबाबतची माहिती आपल्या माहेरच्या कुटुंबीयांना दिली होती. त्यानंतर मध्यस्था कडून वाद मिटवण्यात आला होता. तरीसुद्धा गुरुसिद्धवा हिचा मानसिक छळ सुरूच होता.  गुरुसिद्धवा हिने पती प्रशांत हा कागल औद्योगिक वसाहतीमध्ये नेहमीप्रमाणे कामावर गेल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास साडीने गळफास घेतला. तत्पूर्वी तिनेरात्री अकाराच्या सुमारास आपल्या भाचीला मी जीवाचे बरेवाईट करून घेणार असल्याचा मेसेज मोबाईलवर केला होता. दरम्यान, पहाटे 4 च्यासुमारास भाचीने तो मेसेज बघून गुरुसिद्धवा हिच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याची प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नसल्याने पती प्रशांत याच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार प्रशांतने घरच्यांशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली असता नेमका प्रकार उघडकीस आला, असे गुरुसिद्धवा यांच्या बहिणीने तक्रारीत म्हटले आहे. 
घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी मंडल पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार, उपनिरीक्षक शिवानंद कार्जोळ, हवालदार बसवराज नेर्ली यांनी पाहणी केली. गुरुसिद्धवा हिची बहीण सुनंदा दुंडाप्पा उप्पार (रा. विजापूर) हिने सासू महानंदा हागरगी हिच्याविरोधात फिर्याद दिली आहे.
---

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
राजू कागे यांची मंत्रिपदावर नजर ....!मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलनBN7 NEWS च्या बातमीला मिळाली दाद ....! पालिकेने करून दिली तलावात येणाऱ्या पाण्याला वाट ..!!चोरी करून विकलेले 4 लाखाचे मोबाईल केले मालकांना परतनवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या अरेच्चा खरंच की .... ती ' लंडनची बेबी ' लक्कापाशी नेमकी बोलली कोणत्या भाषेत ?महागाईविरोधात काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन : पेटविल्या चुली फेसबुकवरील मैत्री पडली महागात :  फॉरेनवालीने लक्काप्पाला घातली 7 लाख 5 हजारांची टोपी24 आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून 765 अग्निवीरांनी घेतली देशसेवेची शपथ केपीसीईए-2024 ची तातडीने अंमलबजावणी करा :  नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची सरकारकडे मागणी