LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

मोबाईलसाठी एकाचा खून ....!

केली लोखंडी कांबीने मारहाण ..!!

 हुबळी : मोबाईल साठी एकाचा मुडदा पाडविण्यात आल्याची घटना हुबळी तालुक्यातील रेवडीहाळ परिसरात घडली आहे.
दादापीर कोळकर (वय 38 ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून हुबळी तालुक्यातील चब्बी गावचा तो रहिवासी होता. 

अझीम जमखाने असे आरोपीचे नाव असून त्याने लोखंडी कांबीने मारहाण करून दादापीर कोळकर याचा खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अझीम आणि दादापीर हे दोघे मित्र गवंडी काम करायचे. अझीमने दादापीर याला नवीन मोबाईल घेऊन देण्याची मागणी केली. मात्र, याआधीच घेतलेली  25 हजार रुपये हातउसणी रक्कम अझीमने न दिल्याने नवा मोबाईल घेऊन देण्यास दादापीर याने नकार दिला. यामुळे दोघांत वाद झाला.
यानंतर दादापीर आपल्या घरी निघून गेला. पण, मोबाईल देण्यास नकार दिल्याने अझीम पेटला होता. संतापलेल्या अझीमने घरी जाऊन लोखंडी कांबी घेतली आणि थेट दादापीरचे घर गाठले. दादापीर घरात बसला होता. अझीमने बेसावध दादापीरला लोखंडी कांबीने बेदम मारहाण केली. यामध्ये दादापीरचा मृत्यू झाला. 
या घटनेनंतर अझीम घटनास्थळावरून फरार झाला. 

या प्रकरणी हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृताच्या कुटुंबीयांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST