LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' माता न तू वैरीण ' : विवाहपूर्व शारीरिक संबंधातून जन्मलेल्या नवजात बाळाची हत्या : प्रेमीयुगुलाला पोलिसांनी डांबले तुरुंगात

कित्तूर : लग्नाआधी शारीरिक संबंधातून जन्मलेल्या नवजात बालकाची हत्या करून त्याचा देह कचऱ्यात टाकून देणाऱ्या मातेसह त्याच्या प्रियकराला पोलिसांनी अटक करून कारागृहात धाडले आहे. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी गावात ही घटना घडली आहे.


महाबळेश कामोजी (वय 31 ) आणि सिमरन माणिकबाई (वय 22 ) दोघेही राहणार अंबडगट्टी, तालुका कित्तूर अशी नवजात बाळाची हत्या करून मृत कचऱ्यात टाकून देणाऱ्या प्रेमी युगुलाची नावे आहेत.


एकाच गल्लीत राहणाऱ्या महाबळेश आणि सिमरन यांचे मागील आठ वर्षांपासून एक दुसऱ्यावर प्रेम होते. लग्नाआधी आलेल्या शारीरिक संबंधातून सिमरन ही गर्भवती राहिल्याने दोघेही घाबरले. सिमरन अंगाने थोडी जाड असल्याने ती गरोदर असल्याचे कोणाच्या लक्षातच आले नाही. लग्नाआधीच गरोदर राहिल्याने काय होईल या भीतीने तीनेदेखील हा प्रकार लपवून ठेवला.


प्रसूतीसाठी दवाखान्यात दाखल झाल्यास इतरांना प्रकार लक्षात येईल या विचाराने तिने मोबाईलवर ' सेल्फ डिलिव्हरी ' म्हणजेच स्व प्रसूती कशी करावी यासंदर्भात व्हिडिओ पाहिला आणि त्यानुसार तिने नवजात बालकाला जन्मही दिला. यानंतर सिमरन आणि महाबळेश यांनी नवजात शिशुची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेऊन नवजात बाळाची हत्या केली आणि मृत बाळाचा देह कचऱ्यात फेकून दिला.


स्थानिकांना कचऱ्यात नवजात शिशूचा देह दिसल्याने त्यांनी पोलिसांना ही बाब कळविली. पोलिस योग्य दिशेने तपास करीत सिमरन पर्यंत पोहोचले. पोलिसांनी सीमरनची वैद्यकीय तपासणी केली असता सारा प्रकार लक्षात आला. चौकशीदरम्यान आपणाच बाळाला जन्म दिला होता. पण लग्नाआधी जन्मलेल्या बाळामुळे आपली बदनामी होईल या भीतीने महाबळेशच्या मदतीने आपण त्याची विल्हेवाट लावल्याचे सिमरन ने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी कारागृहात केली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम