LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

विधवेशी जुळले सुत : पतीने केला पत्नीचा खून 

news_1781698043_0_376.webp

बेळगाव : विधवेशी असलेल्या आपल्या प्रेमसंबंधांत आपली पत्नी अडसर ठरेल या भीतीने पतीने पत्नीलाच कायमचे संपविले. पत्नीचा गळा आवळून खून केल्यानंतर तो खून पचविण्यासाठी अपघाताचा बनाव केला. पण, शवविच्छेदन अहवालाने पोल खोलली.
पत्नीचा खून करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक करून कारागृहात पाठवले आहे. ही धक्कादायक घटना बेळगाव जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील शिंदीकुरबेट गावात घडली आहे.
मृत महिलेचे नाव सक्कुबाई पटायत असे असून आरोपी पतीचे नाव संतोष पटायत असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हा पत्नी सक्कुबाईला घेऊन बैलहोंगल तालुक्यातील मरकुंबी गावातील चामुंडेश्वरी मंदिरात गेला होता. दर्शन करून परत येताना त्याने शीतपेयामध्ये उंदराचे विष मिसळून ते देवीचा प्रसाद असल्याचे सांगत पत्नीला पाजले. विष प्राशन केल्यानंतर सक्कुबाई बेशुद्ध पडताच संतोषने रस्त्याच्या कडेला तिचा गळा आवळून खून केला.
हत्या अपघातासारखी भासावी यासाठी त्याने मोटारसायकल पत्नीच्या अंगावर टाकली आणि स्वतःही रस्त्याच्या कडेला पडून राहिला. काही तासानंतर त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करून रुग्णवाहिका घटनास्थळी बोलावली.
मात्र, पोलिसांना घटनेबाबत संशय आल्याने सक्कुबाईचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आणि शवविच्छेदन अहवालाने हा मृत्यू अपघाती नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर गोकाक ग्रामीण पोलिसांनी संतोषला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.
चौकशीत संतोषने गुन्ह्याची कबुली दिली. 
नऊ वर्षांपूर्वी संतोषचा विवाह सक्कुबाईशी  झाला होता. गेल्या चार वर्षांपासून त्याचे गावातील एका विधवेशी प्रेमसंबंध होते. तिच्यासोबत आयुष्य व्यतीत करण्यासाठीच आपण पत्नीचा खून केल्याची कबुली त्याने दिली.
सध्या आरोपी संतोष पटायत हा हिंडलगा कारागृहाची हवा खात आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतता आणि सौहार्दाने मोहरम साजरा करण्यावर भरयुवकाच्या छातीत खुपसला होता चाकू : खूनप्रकरणी तरुणीला 7 वर्षांची कारावासाची शिक्षाइतरांच्या खासगी फोटो-व्हिडिओ शेअर केल्यास तो ठरणार गुन्हा :  डीजीपी डॉ. एम.ए. सलीम यांचे आदेशविष प्राशन केलेल्या ' त्या '  मुख्याध्यापकांचा मृत्यू ...!त्या  प्राध्यापकावर करण्यात आली निलंबनाची कारवाई .! शहर न सोडण्याचा देण्यात आलाय आदेश ..!!232 तहसीलदार ग्रेड-2 अधिकाऱ्यांना पदोन्नती : उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांची माहितीविधवेशी जुळले सुत : पतीने केला पत्नीचा खून पतीने चिरला पत्नीचा गळा : चारित्र्याच्या संशयातून पडला मुडदाहार्ट अटॅकने बॉडीबिल्डरचा मृत्यूगळफास घेऊन पीएसआयने केली आत्महत्या ..!