LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

लॉरी-कारची धडक : 5 जण गंभीर जखमी

पुत्तूर  :  गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या लॉरीने कारला धडक दिली. या अपघातात कारमधील 5 जण गंभीर जखमी झाले. पुत्तूर  रहदारी पोलीस स्थानक हद्दीतील कुटेलू परिसरात सोमवारी रात्री ही घटना घडली आहे. 

यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, कार्कळ तालुक्यातील नक्रे येथील एका कुटुंबातील सदस्य कुके सुब्रह्मण्य येथे दर्शनासाठी वॅगन आर कारने जात होते. कुटेलूजवळ त्यांची कार पोहोचली असता स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या लॉरीने कारला धडक दिली.
या अपघातात कारचालक दीपक (वय 45) तसेच दर्शनासाठी चाललेले यात्रेकरू गुरुराज (वय 46), धनुष ( वय 15 ), भारती ( वय 48 ) आणि गीता ( वय 55 ) हे गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने मंगळूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.
अपघातात लॉरीचालक दामोदर याला कोणतीही दुखापत झालेली नाही.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन चुराडा झालेल्या कारमधून जखमींना बाहेर काढण्यास मदत केली. तसेच जखमींना रुग्णालयात हलविण्यातही त्यांनी सहकार्य केले.
या प्रकरणी पुत्तूर रहदारी नियंत्रण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
बेळगावात पहिल्यांदाच सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीम सादर करणार थरारक हवाई कसरती मुलाने वृद्ध आईला सोडले निर्जनस्थळी ?लॉरी-कारची धडक : 5 जण गंभीर जखमी4 जून रोजी बाळेकुंद्री उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा केला जाणार खंडितदोन दुचाकींची अमोरासमोरून झाली धडक : अपघातात एकाचा जागीच मृत्यू : दुसरा दुचाकीस्वार गंभीरकाळ आला होता पण .....! भीषण अपघात : मात्र सुदैवाने जीवितहानी टळली ..!!आमदार संतोष लाड यांना मंत्रीपद देण्याची केली जातेय मागणी डिकेशी म्हणाले, 'मुख्यमंत्री होत आहे तो मी नाही, तर पक्षाचा कार्यकर्ता मुख्यमंत्री होतोय ..! 'उद्या डी. के. शिवकुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथखर्गे यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक :