LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

माजी सैनिक हत्या प्रकरणात एफएसएल अधिकाऱ्यांचा  सहभाग ...? 

बेळगाव : दोन कोटी रुपयांच्या विमा रकमेच्या लालसेपोटी प्रियकराच्या मदतीने माजी सैनिक असणाऱ्या पतीची हत्या घडवून  तो खून पचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नीला पोलिसांनी प्रियकरासह कारागृहात धाडले.

 पण, हे प्रकरण इटाक्यावरच  थांबलेले नाही तर या प्रकरणामध्ये केवळ प्रियकरच नाही तर फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) अधिकाऱ्यांचे हातही अडकले असल्याचे समजते. 

या प्रकरणात बेळगाव येथील एफएसएल कार्यालयातील वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पी. एन. नागराज, प्रयोगशाळा सहाय्यक चन्नय्या, लिपिक (गुमास्ता) अप्पासाहेब नाईक, आरएमपी डॉक्टर बसवराज भस्मे तसेच पोलीस आयुक्त कार्यालयात कार्यरत असलेले एफडीए अधिकारी अशोक गुंजनाळ यांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले असल्याचे वृत्तआहे.

 माजी सैनिक संदीप मंजरगी यांच्या मृत्यूला सुरुवातीला अपघाताचे स्वरूप देण्यात आले होते. मात्र, सखोल तपासादरम्यान हा पूर्वनियोजित खून असल्याचे समोर आले.
या प्रकरणात एफएसएल अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन अहवाल तसेच एफएसएल अहवालात फेरफार करून तपासाची दिशा भरकटविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. राज्यात प्रथमच खून प्रकरणात एफएसएल अधिकाऱ्यांचा सहभाग समोर आल्याने या घटनेची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
.
तपासात माजी सैनिकाची पत्नी सुमा ( मुख्य आरोपी) हिच्याकडून पैशांची देवाणघेवाण झाल्याचे निष्पन्न झाले असून, एफडीए अधिकारी अशोक गुंजनाळ यांच्या माध्यमातून एफएसएल अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत पत्नी सुमा, तिचा प्रियकर पुंडलिक, मित्र सचिन यांच्यासह एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
माजी सैनिक हत्या प्रकरणात एफएसएल अधिकाऱ्यांचा  सहभाग ...? मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याविरोधातील अवमानकारक वक्तव्याचा निषेध :  रासिंगे यांच्या हकालपट्टीची दलित नेत्यांनी केलीय  मागणीबेळगावकरांनो सावधान ...! वाहतूक नियमभंगावर आहे, आता एआयची नजर ...!!हेल्मेट नसल्यास आता मिळणार नाही पेट्रोल ...? हेल्मेट जनजागृतीसाठी अनोखा प्रयोग :  हेल्मेट नसल्यास पेट्रोल न देण्याचे बेळगाव पोलिसांनी केलंय आवाहन ..!मधुमेहाबाबत अनावश्यक भीती बाळगू नका : डॉ. संदीप श्रीवास्तवभूमी वात्सल्य फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटपासह करण्यात आले वृक्षारोपण'रवळनाथ' हौसिंग फायनान्सच्या सेवकांना सुधारित वेतन लागू :  संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली माहितीबोरगाव सर्कल रुंदीकरण कामात दुजाभाव अधिकारी, लोकप्रतिनिधीसहस्थानिक नेत्यांनी लक्ष देण्याची मागणी जुगार अड्ड्यावर छापा :  20 जण अटकेतबँकॉकहून आणण्यात आलेला 13.14 कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा कस्टमकडून जप्त : सहा जणांना अटक