LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अथणीत होतंय बेकायदेशीर माती उत्खनन ?  मग प्रशासन गप्प का ?

अथणी : अथणी तालुक्यात बेकायदेशीर माती उत्खनन केले जात असल्याची चर्चा कानी पडत आहे. भूमाफियांकडून येथे कोट्यवधी रुपयांच्या मातीची लूट सुरू असल्याचे गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहेत.

तालुक्यातील विविध भागांमध्ये दिवसाढवळ्या आणि रात्रीच्या वेळीही मोठ्या प्रमाणात मातीचे उत्खनन सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या या गैरप्रकारांकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष का करत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
भूमाफियांचे जाळे इतके मजबूत झाले आहे की, त्यांच्या विरोधात कोणीही उघडपणे बोलण्यास धजावत नसल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
बेकायदेशीर माती उत्खननामुळे शासनाच्या महसुलाचे मोठे नुकसान होत असून पर्यावरणालाही धोका निर्माण झाला आहे.अथणी तालुक्यात सुरू असलेल्या या कथित बेकायदेशीर उत्खननाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कृष्णा नदीकाठी मगर ..! तरुणाचा दरीतील पाण्यात बुडून मृत्यू : मौज मजेसाठी गेला होता मित्रांसोबत ..!ज्ञानमंदिरात घाण : विकृत मनोवृत्तीने केले शिक्षकी पेशाला  बदनाम ...!मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रिया प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचे आवाहनजागतिक रक्तदाता दिनानिमित्त बेळगावात मेगा रक्तदान शिबिर व जनजागृती रॅली : के. एन. शिवकुमार म्हणाले, ' रक्तदान करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारीप्रमोद मुतालिक यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल ..!एमएलआयआरसीच्या “योग फॉर हेल्दी एजिंग” ला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसादऑटोनगर व रामतीर्थनगर औद्योगिक क्षेत्रांच्या विकासासाठी  विशेष निधी मंजूर करा : किरण जाधव यांची केंद्राकडे मागणीह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनने दिलाय उपोषणाचा इशारा : केली आहे लोकमागण्यांच्या पुर्ततेची मागणीसरसंघचालक आणि प्रियांक खर्गे यांच्यात शाब्दिक फटकेबाजी : प्रियांक खर्गे यांनी केलाय प्रश्नांचा भडिमार ; सरसंघचालकांनीही केलाय शाब्दिक पलटवार ..!