LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

पतीने चिरला पत्नीचा गळा : चारित्र्याच्या संशयातून पडला मुडदा

कोलार : प्रेमविवाह केलेल्या पतीनेच पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मालूर तालुक्यातील मिंडहळ्ळी तलावाजवळ घडली.

योगिनी ( वय 21, राहणार: चिंतामणी, जिल्हा :चिक्कबळ्ळापूर ) असे या घटनेतील दुर्दैवी मृत महिलेचे नाव आहे. तिचा पती गणेश (रा. आवलहळ्ळी, बेंगळूर ग्रामीण जिल्हा) याने हा खून केल्याचे सांगितले जात आहे.
दोन वर्षांपूर्वी योगिनी आणि गणेश यांनी प्रेमविवाह केला होता. योगिनी नरसापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत काम करत होती. अलीकडे गणेशला पत्नीच्या चारित्र्यावर संशय येत असल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.
हा वाद विकोपाला गेला आणि गणेशने चाकूने योगिनीचा गळा चिरून मारल्याचे कळते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतता आणि सौहार्दाने मोहरम साजरा करण्यावर भरयुवकाच्या छातीत खुपसला होता चाकू : खूनप्रकरणी तरुणीला 7 वर्षांची कारावासाची शिक्षाइतरांच्या खासगी फोटो-व्हिडिओ शेअर केल्यास तो ठरणार गुन्हा :  डीजीपी डॉ. एम.ए. सलीम यांचे आदेशविष प्राशन केलेल्या ' त्या '  मुख्याध्यापकांचा मृत्यू ...!त्या  प्राध्यापकावर करण्यात आली निलंबनाची कारवाई .! शहर न सोडण्याचा देण्यात आलाय आदेश ..!!232 तहसीलदार ग्रेड-2 अधिकाऱ्यांना पदोन्नती : उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांची माहितीविधवेशी जुळले सुत : पतीने केला पत्नीचा खून पतीने चिरला पत्नीचा गळा : चारित्र्याच्या संशयातून पडला मुडदाहार्ट अटॅकने बॉडीबिल्डरचा मृत्यूगळफास घेऊन पीएसआयने केली आत्महत्या ..!