LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : युवकास जबर शिक्षा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : युवकास जबर शिक्षा


संकेश्वर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी 23 वर्षीय युवकाला न्यायालयाने जबर शिक्षा ठोठावली. दर्शन भगवंत हुणश्याळी ( राहणार- शंकर नगर, संकेश्वर) असे सजा झालेल्या युवकाचे नाव आहे.
दर्शन याने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला दुचाकीवरून नेले आणि तिच्यावर अत्याचार केला.
या प्रकरणी दर्शन हुणश्याळी विरोधात संकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
संकेश्वर पोलिसांनी दर्शनला पोक्सो कायद्या अंतर्गत गजाआड करुन त्याच्यावर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी साक्षीपुराव्या आधारे भारतीय दंड संहिता आणि पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपी दर्शन हुणश्याळी याला 30 वर्षांचा कठोर कारावास व 1 लाख रुपये दंड, बीएनएस कलम 137 अंतर्गत आरोपीला 7 वर्षे जादाची कैद आणि 25 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. त्याचबरोबर पिडीत बालिकेला जिल्हा कायदा सेवा प्राधिकारच्या वतीने 4 लाख रुपये परिहार धन देण्याचा आदेश देण्यात आला.
न्यायालयात पिडीत बालिकेच्या बाजूने सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांनी काम पाहिले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम