LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

शहापूरातून केला गेला गोवा बनावटीचा दारू साठा जप्त

बेळगाव : शहापूर पोलिसांनी आज हुलबत्ते कॉलनीतील एका घरावर छापा टाकून गोवा बनावटीचा बेकायदेशीर मद्यसाठा जप्त केला. याप्रकरणी महाद्वार रोड येथील रहिवासी सुभाष सुधीर डे यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


सुभाष सुधीर डे यांनी हुलबत्ते कॉलनीतील आपल्या नातेवाईकांच्या घरात गोवा बनावटीच्या 1,37,681 रुपये किंमतीच्या 313.3 लिटर दारू बाटल्या दडवून ठेवल्या होत्या. याची कुणकुण पोलिसांना लागली.. पोलिसांनी छापा टाकून हा अवैद्य दारूसाठा जप्त केला आणि याप्रकरणी
शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.


शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यान्ग, उपायुक्त रोहन जगदीश, उपायुक्त निरंजन राज अर्स, मार्केट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस. एस. सिमानी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
धाड पथकात नागराज ओसप्पगोल, संदीप बागडी, जगदीश हाडिमणी, श्रीधर तळवार, श्रीशैल गोवावी, सुरेश लोकुरे, अजीत शिपुरे, सिद्धरामेश्वर मुगळखोड आणि विजय कमते या पोलिसांचा समावेश होता.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम