LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

कंट्री बनावटीची पिस्तुले तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश :  13 जण अटकेत : 9 पिस्तुले जप्त

खानापूर पोलिसांची कारवाई

बेळगाव : कंट्री बनावटीची पिस्तुले तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश खानापूर पोलिसांनी केला आहे. या कारवाईत पोलिसांनी 13 जणांना चतुर्भुज केले असून त्यांच्याकडून  9 कंट्री पिस्तुले, जिवंत काडतुसे तसेच शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक बी. रामराजन यांनी ही माहिती दिली आहे.

खानापूर तालुक्यातील कातगळी गावात कंट्री बनावटीची पिस्तुले तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पिस्तुले तयार करणारा, ती खरेदी करणारे, दारुगोळा पुरवणारे तसेच पिस्तुलांच्या बॅरलचे वेल्डिंग करणारे अशा एकूण 13 जणांना 9 कंट्री पिस्तुले आणि जिवंत काडतुसे अटक करण्यात आली आहेत, असेही रामराजन यांनी सांगितले आहे.

 मारुती श्रीकांत सुतार (रा. कातगळी, ता. खानापूर) हा 2024 पासून आपल्या घरात कंट्री बनावटीची पिस्तुले तयार करून विक्री करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. त्याच्याविरोधात  खानापूर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र कायदा 1959 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी मुख्य आरोपीकडून एक पिस्तूल जप्त केले. तसेच त्याच्याकडून पिस्तुले खरेदी केलेल्या आठ जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातील आठ कंट्री पिस्तुले जप्त करण्यात आलीआहेत. याशिवाय शस्त्रनिर्मितीसाठी आर्थिक मदत करणाऱ्या आणखी एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात उत्तर कन्नड जिल्ह्यातील रामनगर येथे बंदुकीचे सुटे भाग आणि दारुगोळा पुरवणाऱ्या आरोपीला अटक करून त्याच्याकडून 21 गन पार्ट्स, 5 हेड, 15 निपल्स, एक सीलिंग बेल्ट, 34 दारुगोळ्याची पाकिटे, 449 शिसे गोळ्या, 420 कॅप्स आणि 48 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
तसेच बेळगाव शहरातील परवान्याची मुदत संपलेल्या गन शॉपमधील उर्वरित दारुगोळा आणि सुटे भाग बेकायदेशीरपणे विक्री केल्याप्रकरणी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली. देसूर येथील वेल्डिंग दुकानात पिस्तुलांच्या बॅरलचे वेल्डिंग करणाऱ्या व्यक्तीलाही अटक करून त्याचे वेल्डिंग मशीन जप्त करण्यात आले आहे.

#pistol 
#khanapur
#13arrest 
#khanapurpolice
#ramrajan

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
राजू कागे यांची मंत्रिपदावर नजर ....!मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलनBN7 NEWS च्या बातमीला मिळाली दाद ....! पालिकेने करून दिली तलावात येणाऱ्या पाण्याला वाट ..!!चोरी करून विकलेले 4 लाखाचे मोबाईल केले मालकांना परतनवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या अरेच्चा खरंच की .... ती ' लंडनची बेबी ' लक्कापाशी नेमकी बोलली कोणत्या भाषेत ?महागाईविरोधात काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन : पेटविल्या चुली फेसबुकवरील मैत्री पडली महागात :  फॉरेनवालीने लक्काप्पाला घातली 7 लाख 5 हजारांची टोपी24 आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून 765 अग्निवीरांनी घेतली देशसेवेची शपथ केपीसीईए-2024 ची तातडीने अंमलबजावणी करा :  नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची सरकारकडे मागणी