LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' त्या ' थरारनाट्य प्रकरणात चौघांना अटक

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील गोकाक शहरातील लक्ष्मी लेआऊट परिसरात घडलेल्या ' त्या ' थरारनाट्य प्रकरणात गोकाक शहर पोलिसांनी चौघा संशययीतांना ताब्यात घेतले आहे. 

आर्थिक व्यवहाराच्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. 
गोकाक शहर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अप्पासाहेब भजंत्री हे आश्रय लेआऊट येथे ऑक्सफर्ड स्कूल चालवत होते. त्यांनी ही शाळा व संबंधित जमीन सचिन साम्याड यांना विकली होती. मात्र, व्यवहाराशी संबंधित पैशांच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. शाळेचा ताबा आणि आर्थिक व्यवहार यावरून दोन्ही कुटुंबांमध्ये तणाव वाढला.
दरम्यान, शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या काही व्यक्तींना शाळेचा ताबा घेण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर वाद विकोपाला जाऊन मारहाण झाली. हल्ल्यात कोयता आणि लोखंडी रॉडचा वापर करण्यात आला होता. ही घटना कॅमेरबद्ध झाली होती आणि बरीच व्हायरलही झाली होती.
या प्रकरणाचा गतीने तपास करून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.  अप्पासाहेब भजंत्री, त्यांचा मुलगा अनिकेत भजंत्री, पुतण्याचा मुलगा आनंद भजंत्री आणि राघवेंद्र भजंत्री अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे.
"या प्रकरणात नागरी स्वरूपाचा (सिव्हिल) वादही असल्याने त्याबाबत शासनाला पत्र पाठविण्यात येणार आहे," असे पोलीस अधीक्षक के. चंद्रशेखर राव यांनी सांगितले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल