LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

लाडलापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर घडला भीषण अपघात

कलबुर्गी : लॉरीने क्रुझरला दिलेल्या जोरदार धडकेमुळे क्रुझरमधून प्रवास करणाऱ्या एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला.
चितापूर तालुक्यातील लाडलापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी उशीरा रात्री हा भीषण अपघात झाला. 

महमद हुसेन (वय 60), फातिमा अब्दुल (वय 40), रसूल बी ( वय 40), महिबूब (वय 37) आणि टोलू पाशा (वय 24) अशी अपघातात मरण पावलेल्या लोकांची  नावे आहेत. 
अपघातातील मृत हे इंगलगी गावचे रहिवासी होते.

 कुटुंबातील एका व्यक्तीला पक्षाघाताचा झटका आल्याने त्याला उपचारासाठी यादगीर येथील रुग्णालयात ते गेले होते. त्याला रुग्णालयात दाखल करून परत गावाकडे येत असताना लाडलापूरजवळील राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या क्रुझरला लॉरीने जोरदार धडक दिली. 
लारीच्या जबर धडकेत क्रूझर पूर्णपणे चक्काचूर झाला आणि आत बसलेल्या एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. 

#accident #5died #kalburgi #bn7news

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगा जखमी बेळगाव महापालिकेतील 58 नगरसेवकांच्या मालमत्तेची पडताळणी अतिक्रमण हटाव मोहिमेला आलाय वेगघुसखोरीच्या संशयावरून बेळगाव पोलिसांकडून करण्यात आली 20 जणांची चौकशी ..!वेदगंगा आटल्याने पाणीप्रश्न गंभीर :  शहरवासीयांची पाण्यासाठी होतेय धावाधाव खानापुरात उद्या रंगणार आंतरराष्ट्रीय दंगल ..!इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा स्फोट होऊन लागली दुकानाला आग : सुमारे लाख-दीड लाख रुपयांचे झाले नुकसान सहकारी पतसंस्थांच्या कार्यात लोकविश्वास महत्त्वाचा : युवराज हुलजी यांचे प्रतिपादन 52 गंभीर गुन्ह्यांची प्रकरणं राज्य सरकार घेणार मागे ...!टायर फुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलरच कलंडली : अपघातात तान्हुल्यासह 12 जण जखमी