LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

जमीन वादातून गोळीबार : पायाला गोळी लागून युवक जखमी

धारवाड : जमीन वादातून झालेल्या वादात एका युवकावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना धारवाडमध्ये घडली आहे. या घटनेत विठ्ठल वालिकर (वय 24) हा युवक जखमी झाला असून त्याच्या पायाला गोळी लागली आहे.
ही घटना धारवाडमधील ट्रायबल आयटी परिसरासमोर घडली.

 मिळालेल्या माहितीनुसार, हुबळी येथील एका डेव्हलपरच्या खासगी गनमनने हा गोळीबार केल्याचे कळते. जखमी विठ्ठल वालिकर याला तत्काळ धारवाड येथील एसडीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदर घटना त्या वेळी घडली, जेव्हा संबंधित डेव्हलपर जमीन विकासासाठी त्या ठिकाणी आला होता. यावेळी जमीन मालक विठ्ठल आणि डेव्हलपरच्या समर्थकांमध्ये वाद झाला. हा वाद वाढला आणि जवळच उभ्या असलेल्या डेव्हलपरच्या खासगी गनमनने  गोळीबार केला. यात विठ्ठल वालिकर जखमी झाले.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल