LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अखेर पोलिसांनी त्या ठकसेनाच्या मुसक्या आवळल्याचं ....!

बेळगाव : अगरबत्ती पॅकिंग करण्याचा रोजगार देण्याचे आमिष दाखवून महिलांना सुमारे 2 कोटी रुपयांचा गंडा घालून पोबारा केलेल्या पंढरपूरी ठकसेनाला अखेर शहापूर पोलिसांनी जेरबंद केले.


घरबसल्या अगरबत्ती पॅकिंग करण्याचा रोजगार देण्याचे आमिष दाखवून या ठकसेनाने बेळगावच्या शेकडो महिलांची आर्थिक फसवणूक करून धूम ठोकली होती. महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या या आरोपीला शहापूर पोलिसांनी अखेर चतुर्भुज केले.


बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर ( वय 35) रा. जाळोळी ( तालुका-पंढरपूर) सध्या राहणार पूरसंघी ( पुणे ) याने महिलांना अगरबत्ती पॅकिंगचे काम देतो असे सांगून सेक्युरिटी अमाउंट च्या नावाखाली प्रत्येकाकडून त्याने 2500 हजार रुपये घेतले होते. ही रक्कम तब्बल 2 कोटींच्या घरात होती.
बी.एम. ग्रुप महिला गृहोद्योग समूह या नावाने गृहोद्योग चालविणाऱ्या या भामट्याने हजारो महिलांकडून पैसे घेतल्यानंतर पोबारा केला होता. लक्ष्मी आनंद कांबळे (रा. पाटील गल्ली, खासबाग-बेळगाव) यांनी 25 ऑक्टोबर 2025 रोजी या विरोधात शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती..
तसेच या फसवणुकीविरोधात शेकडो महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून पोलीस आयुक्तांनाही निवेदन दिले होते. तसेच त्या भामट्याला तातडीने अटक करण्याची मागणी केली होती. पोलिसांनी त्या ठकसेनाचा शोध चालविला होता. आणि शेवटी पोलिसांनी
बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस त्या आरोपीची चौकशी करीत आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम