LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

घालून डोक्यावर फेटा कोल्हापुरी .... ठग्यांनं केली पावणे चार लाखांची चोरी .....!!

कोल्हापूर ( bn7 news) : डोईवर कोल्हापूर फेटा परिधान करून पाहुणा बनून आलेल्या भामट्याने 42 ग्रॅम वजनाचे अंदाजे 3 लाख 78 हजार 470 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. कोल्हापुरात ही घटना घडली आहे.


जय पॅलेस, कळंबा आणि सृष्टी फार्म हाऊस, हणबरवाडी, कोल्हापूर येथील मंगल कार्यालयांत लग्न समारंभासाठी पाहुणा बनून आलेल्या एका ठकसेनाने अंदाजे 3 लाख 78 हजार 470 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने गुंडाळून पलायन केले.
बाळासो उर्फ अजित प्रकाश पाटील (वय 28, रा. आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर) असे त्या भामट्याचे नाव असून सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या भामट्याने पोलीस चौकशीत चोरीची कबुली दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोल्हापूर व पुणे येथे घरफोडी व जबरी चोरीचे एकूण 21 गुन्हे त्याच्यावर दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.


पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
ही यशस्वी कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, डॉ. बी. धीरजकुमार, पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, शेषे मोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम