LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

पैशांच्या वादातून दोघांवर जीवघेणा हल्ला : तिघांविरोधात गुन्हा दाखल

हुबळी : जुन्या हुबळीतील दोघां तरुणांवर पैशांच्या वादातून मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. कर्जाच्या पैशांवरून झालेला वाद विकोपाला जाऊन आरोपींनी जीवे मारण्याची धमकी देत काठीने बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेत जखमी झालेल्या तरुणांवर हुबळीतील किम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कलघटगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, जुन्या हुबळीतील चन्नपेट येथील गफारसाब हा आपल्या मित्र विजय वाळवेकर याच्यासोबत दुचाकीवरून गुडिहाळकडे गेला होता. त्यावेळी उग्नीकेरी-गुडिहाळ रस्त्यावर तिघा युवकांनी विजयला अडवून पैशांच्या कारणावरून वाद घातला. त्यानंतर आरोपींनी काठीने विजयच्या डोक्यावर, पाठीवर, हातांवर आणि पायांवर मारहाण करून गंभीर जखमी केले, असे तक्रारीत नमूद आहे.
भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या गफारसाबलाही आरोपींनी मारहाण केली. तसेच पुन्हा दिसल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
जखमी विजय वाळवेकर व गफारसाब यांच्यावर किम्स रुग्णालयात उपचार सुरू असून, या प्रकरणी कळप्पा गुडिहाळ, राघवेंद्र जाधव आणि विश्वनाथ कोराव यांच्याविरोधात कलघटगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती