LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

डंपरची दुचाकीला धडक :  अपघातात  युवक ठार : दोघे गंभीर 

जखमीपैकी एकाची प्रकृती चिंताजनक

निपाणी  : डंपर व दुचाकीची धडक होऊन रांगोळी येथील महाविद्यालयीन विद्यार्थी ठार झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. गणेश बाबासाहेब कांबळे (वय 18,) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर अर्जुन रमेश मिरजे (वय 18) साहिल कुबेर कांबळे (रा. रांगोळी) हे गंभीर जखमी झाले आहेत. 
अर्जुन मिरजे याची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी,गणेश कांबळे, अर्जुन मिरजे, साहिल कांबळे हे  तिघे बारावीचे गुणपत्रक आणण्यासाठी इचलकरंजीला एम. एच. 0956 क्रमांकाच्या दुचाकीवरून  गेले होते. दुचाकी  रांगोळीकडे येत असताना मुरुमाने भरलेला डंपर (एम एच 51- सी - 1242) इचलकरंजीकडे जात होता. कारदगा फाट्याजवक दुचाकी व डंपरची अमोरासमोरून धडक झाल्याने दुचाकीवरील तिघे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यावेळी नागरिकांनी त्यांना उपचारासाठी इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात घेऊन गेले असता गणेश कांबळे याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
अर्जुन मिरजे याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले असून दोघां जखमीपैकी अर्जुन मिरजे याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते.

#accident
#trippleseat 
#onedied
#2Injured

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल