LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' त्या ' अपघातातील जखमीचे निधन

खानापूर :  22 जून रोजी खानापूर शहरातील शिवाजीनगर परिसरात दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अपघातातील जखमीचे निधन झाले.

एका भरधाव दुचाकीस्वाराने मारुती दळवी यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. या अपघातात सेवानिवृत्त पोस्टमास्तर मारुती नारायण दळवी (वय 68) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांना तातडीने बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान निधन झाले.
 त्यांच्यावर आज, मंगळवार दि. 23 जून 2026 रोजी रात्री 8.00 वाजता त्यांच्या मूळ गावी मणतुर्गा (ता. खानापूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुले एक विवाहित मुलगी तसेच भाऊ व बहिणी असा परिवार आहे.मारुती दळवी हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस आबासाहेब दळवी यांचे लहान बंधू होत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल