LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

क्षुल्लक कारणावरून मारहाण : पानटपरी चालकाचा मृत्यू

क्षुल्लक कारणावरून मारहाण : पानटपरी चालकाचा मृत्यू


बेळगाव : क्षुल्लक कारणावरून चौघां तरुणांनी केलेल्या मारहाणीत एका 48 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. काल मंगळवारी रात्री बोडकेहट्टी ( तालुका - बेळगाव) येथे ही घटना घडली.
याप्रकरणी काकती पोलिसांनी चौघां आरोपींना ताब्यात घेतले आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की, प्रज्वल पाटील, निखिल चौगुले, विवेक चौगुले आणि श्रीधर पाटील हे कडोली गावचे चौघे मित्र दड्डी-मोहनगा यात्रेला गेले होते. मंगळवारी रात्री मोहनगा यात्रा आटोपून ते कडोलीला परतत होते. त्यांनी यात्रेत थोडी दारू ढोसली होती. वाटेवर बोडकेहट्टी येथील एका पान टपरीवर सिगारेट फुंकण्यासाठी ते थांबले. सिगारेट घेतल्यानंतर दुकानदार यल्लाप्पा दुर्गप्पा नाईक ( वय 48, राहणार-बोडकेहट्टी, तालुका बेळगाव) यांनी त्या चौघांकडे सिगारेटचे पैसे मागितल्याने त्या चौघांचा पारा चढला आणि त्यांनी दुकानदार यल्लाप्पा याला जबर मारहाण केली आणि पोबारा केला.
मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या यल्लाप्पा यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.


काकती पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणी गतीने तपास करीत अवघ्या अर्ध्या तासात प्रज्वल पाटील, निखिल चौगुले, विवेक चौगुले आणि श्रीधर पाटील या चौघां संशयीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. अधिक तपास सुरू आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल