LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

शिवसेना उपजिल्हाप्रमुखावर प्राणघातक हल्ला ..!  गळाभेट घेत चाकूने गळ्यावर केले गळा ...!!

छ. संभाजीनगर : गळाभेट घेत शिवसेना उपजिल्हाप्रमुखाचा चाकूने गळा चितल्याची धक्कादायक घटना रविवारी 24 तारखेला रात्री साडेअकराच्या सुमारास छत्रपती संभाजी नगर परिसरात घडली आहे. या घटनेने  छत्रपती संभाजीनगर हादरले आहे.

राम शेषराव बोडखे असे आरोपीचे नाव असून त्याने शिवसेना उपजिल्हाप्रमुख अंबादास आसाराम म्हस्के (वय 55, रा. म्हस्के गल्ली, गणपती मंदिराच्या बाजूला, छावणी) याला मोबाईलवर धमकी देऊन बाबा पेट्रोलपंप चौकात भेटण्यास बोलावले.  
त्यामुळे अंबादास म्हस्के यांनी ही बाब काका खंडू म्हस्के यांना सांगितली. त्यानंतर खंडू म्हस्के आणि अंबादास म्हस्के हे काका-पुतणे एमएच 20 जीएम 7071 क्रमांकाच्या थार गाडीने  राम बोडखेला भेटण्यासाठी रात्री सुमारे साडेअकराच्या सुमारास बाबा पेट्रोलपंप चौकात गेले.
अंबादास आसाराम म्हस्के आपल्या काकासोबत तेथे गेल्यावर आरोपी राम बोडखे याने सावध भूमिका घेत अण्णा मजाक करत होतो म्हणून अंबादास यांची गळाभेट घेतली आणि कमरेत दडविलेला चाकू काढून  बेसावध असणाऱ्या अंबादास यांच्या मानेवर सपासप चाकूचे वार केले. 
या घटनेत अंबादास गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. जवळच उभारलेल्या खंडू मस्के याने धावत जाऊन चाकूने वार करणाऱ्या राम बोडखे याला धक्का देऊन बाजूला केले आणि जखमी अंबादास याला थार गाडीत घालून उपचारासाठी इस्पितळात नेले.  सिग्मा हॉस्पिटलमध्ये  अंबादास यांच्यावर उपचार सुरू आहेत. 
राम शेषराव बोडखे या हल्लेखोराविरुद्ध क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

news_1779733103_0_724.webp

               आरोपी राम बोडखे

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल