LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

चेक बॉन्स : 6 वर्षे फरार आरोपीला जामीन .....!

चेक बॉन्स : 6 वर्षे फरार आरोपीला जामीन .....!


बेळगाव : 5 वर्षे 11 महीने 19 दिवस फरार असणाऱ्या आरोपीला न्यायालयाने काही अटींवर जामीन मंजूर केला. परशुराम शंकर कोलेकर (वय - 41, राहणार : तारीहाळ- बेळगांव) असे जामीन मिळालेल्या आरोपीचे नाव आहे.


परशुराम शंकर कोलेकर यांना सन 2012 मध्ये माल वाहतूक करणारे वाहन खरेदी करण्यासाठी पैशांची गरज होती. यामुळे त्यांनी उद्यमबाग-बेळगाव येथील पुंडलिक गुंडू पाटील यांच्याकडे हातउसने पैसे मागितले. पुंडलिक यांनी मदत म्हणून परशुराम कोलेकर यांना सन 2014 पर्यंत रोखरक्कम आणि चेक अशा स्वरूपात 2 लाख 10 हजार रुपये दिले. या व्यवहाराचे करारपत्र आणि प्रॉमिसरी नोट तयार करण्यात आली. पण ठरल्यानुसार परशुराम कोलेकर यांनी घेतलेली रक्कम पुंडलिक गुंडू पाटील यांना परत करण्यास टाळाटाळ केली.
अनेकदा चकरा मारल्यानंतर आणि विनवणी केल्यानंतर परशुराम शंकर कोलेकर यांनी जानेवारी 2017 मध्ये पुंडलिक गुंडू पाटील यांना 2 लाख 10 हजार रुपयांचा चेक दिला. पण, हा चेक बँकेत वटला नाही. यामुळे पुंडलिक पाटील यांनी परशुराम कोलेकर यांना नोटीस धाडली. त्यानंतर सातवे जे.एम.एफ.सी बेळगांव न्यायालयात कलम 138 नेगोशिबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 खाली आरोपी वर दावा दाखल केला.
ट्रायल कोर्ट (सातवे जे.एम.एफ.सी बेळगांव) न्यायालयाने आरोपी कोलेकर यांना दिनांक 6 जानेवारी 2020 रोजी सदरी रक्कम फीर्यादीला द्यावी नाही तर सहा महिन्याची शिक्षा भोगावी असा निर्णय दिला व सदरी आरोपीचा जामिन रद्द केला व त्यानंतर सबरी न्यायालयाने कनविक्शन वॉरंट जारी केला.
या खटल्यातील आरोपी 5 वर्षे 11 महीने 19 दिवस फरार होता. हिरेबागेवाडी पोलिसांनी 17 डिसेंबर 2025 रोजी आरोपीला अटक करून त्याला सातवे जे.एम.एफ.सी बेळगांव न्यायालय येथे हजर केले. न्यायालयाने सदरी आरोपीची हिंडलगा कारागृहात रवानगी केली.
आरोपीने बेळगांव येथील 5 वे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सदरी ट्रायल कोर्टाच्या निकालाला स्थगीती द्यावी आणि मला जामिन मंजुर करावा म्हणुन न्यायालयात अपील दाखल केले. न्यायालयाने आरोपी व फीर्यादीचे म्हणणे ऐकुण घेऊन 5 व्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने ट्रायल कोर्टाच्या निकालाला स्थगीती देऊन व काही अटींवर आरोपीला जामिन मंजुर केला.
आरोपीच्यावतीने प्रसिद्ध फौजदारी वकील मारूती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम