LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

सर्टिफिकेट घोटाळा : दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

बळळारी : श्री कृष्णदेवराय विद्यापीठाच्या परीक्षा विभागात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या बनावट पदवीदान (कॉन्वोकेशन) प्रमाणपत्र घोटाळा आणि लाखो रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांविरोधात बळळारी ग्रामीण पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

 
विद्यापीठाचे मूल्यांकन कुलसचिव प्रा. एम. एन. साळी यांनी दिलेल्या अधिकृत तक्रारीवरून परीक्षा विभागातील कंत्राटी कर्मचारी महंतेश वाय. (वय 40) आणि हनुमेश सूडी ( वय 35) यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
हा मोठा घोटाळा उघडकीस येऊन अनेक महिने उलटून गेले असतानाही संबंधित दोषींवर कारवाई करण्यात विद्यापीठ प्रशासनाने विलंब केल्याची टीका होत होती. विद्यापीठाच्या या भूमिकेमुळे विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये विविध शंका उपस्थित होत होत्या.
दरम्यान, वाढत्या दबावानंतर विद्यापीठ प्रशासनाने अखेर आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली असून, प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. ग्रामीण पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

#certificate
#scammers 
#BallariDistrict

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
' ही कोल्हेकुई वेळीच थांबवा अन्यथा .....'  : येळ्ळूर म.ए. समितीने दिला ईशारा' त्या ' अपघातातील जखमीचे निधनसतीश जारकीहोळी म्हणाले, '  महाराष्ट्रातून कर्नाटकाला पाणी सोडणे सध्या तरी कठीण 'युपीतील 11 चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या मंत्री सतीश जारकीहोळी यांची लोकअदालत : ऐकल्या लोकांच्या तक्रारीसर्टिफिकेट घोटाळा : दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखलबेळगाव डीसी कार्यालयाच्या नूतनीकरण कामांची मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली पाहणीयंदापासूनच सुरू करणार महाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुका : डी.के. शिवकुमार यांनी केली घोषणाबी. के. हरिप्रसाद यांनी स्वीकारली केपीसीसी अध्यक्षपदाची सूत्रे  एपीएमसीमध्ये अज्ञाताने गळफास घेऊन संपविले  जीवन