LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

कार चालकाचा निष्काळजीपणा : विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू : तीन विद्यार्थिनी जखमी

रायचूर : भरधाव रिव्हर्स घेतलेल्या कारची धडक बसून विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य तीन विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत.
सिंधनूर शहरात आज शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली.


स्थानिक कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे वर्ग संपवून रस्त्याने घरी जात होत्या. त्यावेळी सिंधनूर शहरातील एका खासगी रुग्णालयाजवळ उभी असलेल्या महिंद्रा थार कार चालकाने अचानक वेगाने मागे कार रिव्हर्स घेतली. यावेळी द्वितीय पीयूसीचे शिक्षण घेणाऱ्या 17 वर्षीय भूमिका नावाच्या विद्यार्थिनीला कारची जोरदार धडक बसली आणि ती खाली कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात मेघना ( वय 17 ), माहेश्वरी ( वय 17) आणि जहीदा ( 17 ) या विद्यार्थिनीही जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी एका विद्यार्थिनीचा पाय फ्रॅक्चर झाला असून, इतरांनाही गंभीर दुखापती झाल्या आहेत.


घटना घडतानाचे दृश्य जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कार अतिवेगाने रिव्हर्स घेत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असून, चालकाच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती