LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा निर्घृण खून ..!

हुबळी : अनैतिक संबंधाच्या संशयातून एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना हुबळी तालुक्यातील बयहट्टी गावातील शांतीनगर प्लॉट परिसरात घडली आहे.

 फक्कीरप्पा उर्फ बसू अक्कीवळी अशी खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून, प्रकाश कराशेट्टी याच्यावर फक्कीरप्पा याच्या खुनाचा आरोप आहे. 
प्राथमिक माहितीनुसार, आपल्या पत्नीसोबत फक्कीरप्पा याचे अनैतिक संबंध असल्याचा संशय प्रकाश कराशेट्टी याला होता. याप्रकरणी दोघांमध्ये अनेकदा वादही झाले होते.  या प्रकरणावर याआधी पंचायतही झाली होती. मात्र, त्यानंतरही फक्कीरप्पा याचे प्रकाश कराशेट्टी याचे अनैतिक संबंध संबंध सुरूच होते. याची कुणकुण प्रकाश याला लागली आणि संतापलेल्या प्रकाशने फक्कीरप्पा याची हत्या केली, असा आरोप आहे.
घटनेची माहिती मिळताच हुबळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलीस निरीक्षक मुरुगेश चेन्नन्नवर यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून आरोपी प्रकाश कराशेट्टी याला ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
भरधाव टिप्परच्या ठोकरीने दुचाकीस्वाराचा मृत्यूमतदार यादी विशेष पुनरावलोकन पारदर्शकपणे राबवा : संजय शेट्टण्णावर यांची सूचना'ना पैसा मिळाला, ना प्रियकर....! उलट पती गमवला आणि जन्मदाती आईही '...!!  खावी लागतेय कारगृहाची हवा ...!!   : ' त्या ' महिलेच्या आईने केली गळफास घेऊन आत्महत्या अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा निर्घृण खून ..!अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योगा दिन उत्साहात साजरापिण्यासह शेती पाण्यासाठी नदीत पाणी सोडा  : कर्नाटक राज्य रयत संघटनेची मागणी : तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांचे महामार्गावर आंदोलनमुख्यमंत्री सुवर्णपदक विजेते पीएसआय लोकायुक्तांच्या जाळ्यातट्रकांची धडक आणि आगीचा भडका; वाहने जळून खाकनागनूर रुद्राक्ष मठात 21 जून रोजी हिमालयन ध्यान योगचे आयोजन