LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

ग्रामपंचायत माजी अध्यक्षाची निर्घृण हत्या ..!

बागलकोट : गद्दनकेरी फाट्यावर 45 वर्षीय इसमाची निर्घृण हत्या करण्यात आली. हत्येनंतर त्याचा चेहरा छिन्नविच्छिन्न करण्यात आला. यामुळे भयानक रागातून हा खून करण्यात आला असावा असा कयास आहे.



संगप्पा नालतवाड असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
संगप्पा हे गद्दनकेरी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष होते. ते काँग्रेस नेते म्हणून गावात कार्यरत होते. नुकत्याच संपलेल्या ग्रामपंचायतीच्या कार्यकाळात त्यांच्या पत्नीनेदेखील अध्यक्ष म्हणून सेवा बजावली होती.


संगप्पा यांना संपविण्याचा स्केच घातलेल्या मारेकऱ्यांनी संगप्पा नालतवाड यांना गद्दनकेरी क्रॉसवर गाठले आणि त्यांचा खात्मा केला. इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी संगप्पा यांचा चेहरा झेजरून विद्रुप केला. काम फत्ते करून आलेल्या चारचाकी वाहनातून मारेकरी पसार झाले.


घटनेची माहिती मिळताच आमदार जे. टी. पाटील, एसपी सिद्धार्थ गोयल, डीएसपी गजानन सुतार, ग्रामीण सीपीआय रामण्णा बिरादार यांनी घटनास्थळी धाव घेतली. कलादगी पोलिसांना घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.


या निर्घृण खुनाबद्दल लोकांतून तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. कोणी पूर्व वैमानस्यातून तर कोणी आर्थिक व्यवहारातून ही घटना घडली असावी असे बोलत आहेत. संगप्पा नालतवाड यांनी गद्दनकेरी क्रॉस येथे एक बार लिजवर घेतला होता. यातून उद्भवलेल्या वादातून हा खून झाला असावा असा काहींचा कयास असून हत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती