LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

अपघातात भावाचा जागीच मृत्यू : बहीण गंभीर जखमी

संकेश्वर : बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या ट्रकची  दुचाकीला जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला तर दुचाकीच्या मागील आसनावर बसलेली त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे. आप्पासाहेब लाटकर असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आज सकाळी सुमारे सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास हिटणी- कणगला मार्गावर ही घटना घडली.

आप्पासाहेब लाटकर हे आज सकाळी सुमारे सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास आपल्या मोठ्या बहिणीला सोडण्यासाठी दुचाकीवरून म्हसोबा हिटणीमार्गे कणगल्याकडे जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या बॉक्साईट वाहतूक करणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत आप्पासाहेब लाटकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या बहिणीच्या दोन्ही पायांवरून ट्रकचे चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
 अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
वकिलाला धमकाविणाऱ्या त्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबीत करा : वकील संघाने धाडले मुख्यमंत्र्यांना निवेदन मुख्यमंत्री बदलले तरी परिस्थिती जैसे थे राहिल : माजी मुख्यमंत्री शेट्टर यांनी मारला नेतृत्व बदलावर टोमणापंचकन्यांमध्ये अहिल्येला स्थान देणे, ही भारतीय संस्कृतीची महानता : डॉ. सच्चीदानंद शेवडेधुव्वाधार पाऊस : तवंदीत पाणीच पाणी : वाहनधारकांची उडाली तारांबळ6 जून रोजी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये पदवीदान समारंभगुदमरून चिमुकल्याचा मृत्यूखासगीकरणाविरोधात हेस्कॉम कर्मचाऱ्यांचा एल्गार  ..!उद्या  बेळगावातील अनेक भागात केला जाणार वीजपुरवठा खंडितजिल्हा पोलीस प्रमुखांनी लोकांना केलंय आवाहन : म्हणाले, ' सावधान ..आमिषाला बळी पडू नका '  राहुल जारकीहोळी यांनी केला प्रदेशाध्यक्षांचा सत्कार