कागवाड : दोघां मित्रांनी पैशाच्या वादातून आपल्याच मित्राचा डोक्यात दगड घालून केला. कागवाड तालुक्यातील ऐनापूर गावात ही घटना घडली आहे.
संतोष सिद्धप्पा कामटे (वय 33, रा. ऐनापूर) असे या घटनेत मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
संतोष कामटे हा आपल्या दोन मित्रांसोबत बागेतील नारळ विकण्यासाठी उगार येथे गेला होता. नारळ विक्रीनंतर आलेल्या पैशातून तिघांनी मद्यप्राशन केले आणि त्यानंतर ते ऐनापूरकडे परतत होते. यावेळी नारळ विक्रीतून मिळालेल्या पैशांच्या वाटणीवरून त्यांच्यात जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि सोबत मद्यप्राशन केलेल्या मित्रांनीच संतोषच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे संकलित केले.
अथणीचे डीवायएसपी प्रशांत मुन्नोळी, सीपीआय संतोष हल्लूर आणि पीएसआय राघवेंद्र खोत यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली.
या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे
#murder
#kagwad
#ainapur