LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

भरधाव टिप्परच्या ठोकरीने दुचाकीस्वाराचा मृत्यू

खानापूर : भरधाव टिप्परने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. सातेरी बाबाजी गुरव (रा. लोकोळी, तालुका : खानापूर ) असे अपघातात मरण पावलेल्या इसमाचे नाव आहे. 

खानापूर तालुक्यातील लोकोळी क्रॉस येथे आज  शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.

  सातेरी गुरव हे आपल्या दुचाकीवरून शेताच्या दिशेने जात होते. त्यावेळी पारिश्वाडकडून खानापूरच्या दिशेने वेगाने येणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात सातेरी गुरव गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेण्यात येत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.
मृतदेह बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. सातेरी गुरव यांचा मुलगा पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेला आहे. तो परतल्यानंतर लोकोळी येथे सातेरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते.

सातेरी गुरव त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल